पुण्यात राहत होते तेव्हाचा प्रसंग आहे. Architecture च्या पहिल्या वर्षाला होते तेव्हा. आमची Workshop आणि Basic Design ची external jury होती. दोन्ही विषयांचे वर्षभरात भरपूर models बनवले होते. एकाच दिवशी दोन्ही विषय आल्याने जरा पंचाईतच झाली होती. एवढ सामन नेणार कसं? कारण मी राहायचे कोथरूड डेपोजवळ आणि कॉलेज होत, डेक्कन जिमखान्याच्याही पुढे, F.C. रोडवर! तेव्हा पेइंग गेस्ट म्हणून राहत होते, त्यामुळे मदतीलाही कोणी नव्हत.
Jury च्या आदल्या दिवशी कामात गुंतले असताना बाबांचा फोन आला. त्यांनी नुकतीच t.v.वर बातमी पहिली कि, "उदया पुण्यात रिक्षाचा संप आहे." आमच्या building खालीच रिक्षा stand होता, त्यामुळे ते रिक्षावाले ओळखीचे होते, शिवाय हा काही त्यांचा पहिला संप नव्हता, याआधीही बरेच संप झाले होते. त्यामुळे जास्त पैसे देऊन, यापूर्वी संपातून प्रवास केला होता. बाबांना म्हटलं, "काळजी करू नका आमची setting आहे नेहमीची!"
माझ्यासोबत माझी वर्गमैत्रिण जान्हवी सुद्धा पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. तिच्या आई Jury च्या आदल्या दिवशी राहायला आल्या होत्या. रात्रभर जागून काम केलं. (आमच्या भाषेत night मारली!) दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता आमची वरात कॉलेजला जायला निघाली. सोबत भरपूर सामान होत. रिक्षा पकडायला खाली आलो. कोथरूड ते कॉलेज 60 ते 70 रुपये होत असत. त्यादिवशी घासाघीस करून रिक्षावाला 150 रुपयांत तयार झाला. रोजची ओळख असूनदेखील! ('संप म्हणजे कमवायचा दिवस!' असच वाटलं मला!) आणि समान तर इतक होत कि, मला आणि जान्हवीला वेगवेगळी रिक्षा करवी लागली. रिक्षा चालू झाली, थोड अंतर गेल पुढे गेल असू, रस्त्यावरच्या एका माणसाने रिक्षावाल्याला हाक मारली, " ओओ कुठे चाललात राव??" "काही नाही, बहिण आहे, कॉलेजला सोडून येतो" रिक्षा न थांबवताच तो बोलला.
पोहचले एकदाचं कॉलेजला! दिवसभराच्या धावपळीत संप विसरूनच गेले. जान्हावीचे पालक आले होते, तिला बाहेर जायचं होत, त्यामुळे ती त्यांच्यासोबत लवकर निघून गेली. माझा क्रमांक यायला बराच उशीर झाला ('सावंत' आडनाव असल्यामुळे!!!) Jury झाली. कॉलेजमधून निघाले. 5.30-6 वाजले असतील. वाटल, इतक्या वेळात संप निवळला असेल, पण छे, रस्त्यावर एकही रिक्षा दिसत नव्हती. सुमारे अर्धा तास शोधल्यावर एक रिक्षा दिसली. त्याने 200 रुपये सांगितले. शेवटी घासाघीस केल्यावर 150 ला तयार झाला.शिवाय रिक्षाशिवाय दुसरा पर्यायदेखील नव्हता. बसने एवढ सामान घेऊन जाण कठीण होत. बसले रिक्षात!
सामान पकडून बसले होते. रिक्षा पौड फाट्याजवळ पोहचली. म्हणजे जवळजवळ अर्ध अंतर पार केलं. दशभुजा गणपती जवळचा पूल पार केल्यावर रिक्षा सिग्नलला थांबली होती. तेवढ्यात एक माणूस रिक्षात रिक्षावाल्याच्या बाजूला येऊन बसला. मला तर आधी काही लक्षातच नाही आलं. त्याने रिक्षावाल्याला रिक्षा उजवीकडे वळवायला सांगितली. मला तर सरळ जायचं होत. मी काही बोलायच्या आधी, त्याने रिक्षा वळवून थांबवली. तो माणूस खाली उतरला. त्याने तिथे पडलेला एक मोठा दगड दोन्ही हातांनी उचलला व तो रिक्षासमोर आला. मला काही कळायच्या आत त्याने तो दगड हवेतून रिक्षेच्या समोरच्या काचेवर मारला. क्षणात माझ्या आजूबाजूला काचांचा खच पडला. किमान मी मागे बसलेले. रिक्षावाला तर पुढे बसलेला. त्याला तर लागलंही असेल. मग एका माणसाने त्याला कॉलरला पकडून खेचून बाहेर काढलं. त्याला त्याने जोरात मुस्कटात मारलं. दरम्यान मी भानावर आले. रिक्षातून बाहेर आले. बाहेर 10-20 लोकांचं टोळकं उभं होत. त्यांनी त्या रिक्षावाल्याला मारायला सुरवात केली. "तुझ्याच भल्यासाठी करतोय ना आम्ही?? कळत नाही का संप आहे ते???? हां हां रिक्षा चालवायला पाहिजे, घे आता." असं बोलत ते लोक त्याला मारत होते. त्यातल्या काहींनी परत आपला मोर्चा रिक्षाकढे वळवला. पुढे काय होणार हे माझ्या ध्यानात आलं. मी त्यांना थांबण्याची विनंती केली. पण ते कुठे भानावर होते! इतक्यात आजूबाजूला खूप लोक गोळा झाले होते. त्यातले काही लोक मध्ये पडले. मी माझं सामान बाहेर काढून घेतलं. त्या माणसांनी रिक्षावाल्याला सोडून दिलं व ते लोक पुढे निघून गेले. नवीन शिकार मिळवण्यासठी! रिक्षावालापण आपली रिक्षा घेऊन निघून गेला. लोकही पांगले.
आता फक्त मी उरले होते. फूथपाथवर सगळे मॉडेल्स ओळीने ठेवले होते. पाठीवर दप्तर आणि हातात शीट्सचा गठ्ठा या अवस्थेत विचार करत उभे होते. घरी कसं जाऊ? बसने जाणं शक्य नव्हत. परत त्याच किंवा दुसऱ्या रिक्षाने जायचा प्रश्नच नव्हता. अचानक घरची आठवण आली आणि डोळ्यांत पाणी तरळल! बाबांची आठवण आली. वाटलं, घरी राहत असले असते तर बाबांना फोन बोलावलं असतं! पटकन आले असते ते!
तेवढ्यात मघाशी public मध्ये उभा असलेला एक मुलगा पुढे आला. " Can I help You? Do you want a lift?" नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता,मदतीची खरंच गरज होती. तो तिथेच राहत असावा. तो आपली bike घेऊन आला. त्याच्यासोबत त्याचा अजून एक मित्र दुसऱ्या bike वर होता. मग आम्ही माझं सामान 2 bikes वर चढवलं. मी दोन हातात दोन contour models, मारुतीने द्रोणगिरी पर्वत पकडल्यासारखी पकडली होती!
त्या मुलांनी मला कोथरूडला पोहचवलं! त्यांचे मनापासून आभार मानले, ते दोघ निघून गेले.
इमारतीखालच्या दुकानात सामान ठेवलं. दोन फेऱ्यामारून, चार जिने चढून सगळ सामान एकदाचं रूमवर पोहचवलं! अजून धडधडत होत. आल्यावर सोनमला मिठीच मारली.
शाळेत गावकर बाईंनी सांगितलेली गोष्ट आठवली, एकदा जपानमध्ये एका बूटाच्या कंपनीत संप झाला. पण कामगारांनी काम नाही थांबवलं. दंडाला काळ्या फिती लावून ते वेळेत कामावर हजार झाले. कामही चालू केलं. पण बनवले फक्त उजव्या पायाचे बुट!त्यांच्या मागण्या मान्य झाल्या! आपल्या देशात 'संप म्हणजे सुट्टी' या नजरेने बघितले जाते. लहानपणी या संपाच्या सुट्टीची मजा यायची. पण हा प्रसंग घडल्यानंतर त्यामागच्या गंभीरतेची कल्पना आली. आपल्याकडे तर शिक्षक, रिक्षावाले, बस कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे कर्मचारी, वैमानिक, सरकारी कर्मचारी असे आळीपाळीने संपावर जातच असतात.
पश्चिम रेल्वेच्या motorman's चा नुकताच झालेला संप आठवतोय ना? सायंकाळच्या, घरी जाण्याच्या, कार्यालये सुटण्याच्या वेळेवर केलेल्या संपामुळे मुंबईकरांची खूप तारांबळ उडाली.खाजगी वाहने, बेस्ट बसेस सगळी वाहने भरभरून चालली होती. रस्त्यावर खूप गर्दी होती. रेल्वे प्लाटफॉर्मवर झालेल्या गर्दीत एका महिलेला आपला जीवही गमवावा लागला. माझ्या कॉलेजपासून घरी येणाच्या रस्त्यावर बाहेरगावी जाणाऱ्या खाजगी बसेस लागतात. त्यांचे वाहक रस्त्यावर उभे राहून ओरडत होते, "बोरीवली 100 रुपये!!!!" मी राहते Elphinstone ला! जिथे Elphinstone ते बोरीवली 8 रुपये तिकीट आहे, तिथे एकदम, अचानक 100 रुपये सामान्य मुंबईकरांसाठी खूप महाग आहेत हो! विचार करा. लोकांच्या लाचारीकडे पैसे कमवायची 'पर्वणी', 'संधी' म्हणून बघू नका!
'त्या' रिक्षावाल्याच्या चेहऱ्यावरचे अगतिक भाव आठवत आहेत. रिक्षा चालवली नाही, तर त्यादिवशीच उत्पन्न बुडणार! रिक्षा चालवली, 150 रुपये भाडं ठरवून! रिक्षा चालवल्यामुळे रिक्षाच तर प्रचंड नुकसान झालच पण जमावाकडून मारहाणही झाली.
समस्या सगळ्यांनाच आहेत. संपालाही ना नाही. पण संप करून सामान्य लोकांचं जीवन वेठीस धरणं कितपत योग्य आहे? संप करणाराही सामान्य माणूसच! उदाहरणार्थ, बसकर्मचारी संपावर गेले म्हणून त्रासणारा माणूस, बँक कर्मचारी असू शकतो. पुढे बँकेचा संप आहे म्हणून बस कर्मचाऱ्याला त्रास होणारच! हे एक दुष्टचक्र आहे. महागाई, भ्रष्टाचार याचे हे परिणाम! हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी मुळापासून प्रयत्न केले पाहिजेत, "सर्व" लोकांनी संघटित झाले पाहिजे! (संपासाठी संघटीत नव्हे!) संप करणे हा काही एकमेव उपाय नाही. संपाच हत्यार खूप धारदार आहे. ते जपूनच वापरल पाहिजे!