पाचवीचा वर्ग. माध्यमिक शाळेचा पहिला दिवस. 'ब ' वर्गात टाकल्याने जरा रागावलेलेच होते. आमचा आधीचा वर्ग आणि 'क' वर्ग यांची मिळून एक तुकडी तयार केली होती. सर्व मुली! शिवाय नापास झालेल्या मुली होत्याच. २-३ नवीन मुली पण आल्या होत्या. नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि विशेष म्हणजे नवीन मैत्रिणी, यांचं कुतूहल वाटत होत. इकडच्या प्रथेप्रमाणे मतदान घेऊन वर्गमंत्री (monitor) निवडण्यात आले. मी वर्गप्रमुख झाले. नव्या गोष्टींचं कुतूहल संपून, अभ्यासाला सुरुवात झाली.
माझी 'तिच्याशी' ओळख झाली. 'ती' दुसऱ्या शाळेतून आली होती.नवीन प्रवेश! काळा-सावळा रंग, कपाळावर गोंदणाचा ठिपका, दुमडून बांधलेल्या लांबसडक वेण्या, नाकात चमकी...तिच्या बोलण्यात एक ग्रामीण हेल होता. नवीन असल्यामुळे किंवा तिच्यातल्या ग्रामीणपणामुळे, इतर मुली तिच्याशी बोलण्यास किंवा मैत्री करण्यास फार उत्सुक नसतं. माझी आणि तिची ओळख वाढत गेली. ती आधी globe mill passage school मध्ये शिकत होती. ही शाळा माझ्याच विभागात आहे. "महापालिकेची शाळा!" माफ करा, परंतु आपण कितीही नाकारलं तरीही, आपल्या मनात 'municipality' च्या शाळेबद्दल जरा वाईटच प्रतिमा असते. माझ्याही मनात होती...असो..
तिला ४ थी ला ६५% मिळाले आणि ती शाळेत पहिली आली. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला, 'अजून चांगल्या शाळेत' पाठवायचं ठरवलं.. आणि तिची रवानगी माझ्या शाळेत झाली! ती काही माझी अगदी खास मैत्रीण नव्हती. पण तिला जास्त जवळची अशी मीच होते. ती मला बऱ्याच गोष्टी सांगायची. आमची अजून एक ओळख निघाली. माझे बाबा ज्याठिकाणी काम करत, त्याच कंपनीच्या आवारात तिचं घर होत. घर! पत्र्याचं, बैठ घर..ते लोक तिथे नवीनच राहायला आले होते. ती मला सांगायची, "तुझे बाबा भेटतात. भेटले कि नेहमी अभ्यासाबाद्द्ल विचारतात."
तिचे आईबाबा आणि ४ भावंड गावी राहत असत. तिला तिच्या मावशीने दत्तक घेतलं होत. मावशी व काकांसोबत ती मुंबईत राहत होती. मधल्या सुट्टीत दमशराज खेळायला ती असे. आमच्या वर्गाच्या लंगडीच्या संघात पण ती होती.. दिवस जात होते...
एक दिवस तिने मला सांगितलं, आई आणि मावशीमध्ये वाद आहेत माझ्यावरून. त्याचं फारसं पटतही नाही एकमेकींशी. मी तरी काय सांगणार तिला! तिचं अभ्यासातलं लक्ष कमी होत चाललेलं. मुळातच मितभाषी होती ती, आता तर खूपच शांत आणि एकटी राहू लागली होती. एक दिवस शाळेत पालकसभा होती. तिचे मावशी-काका आले होते. आले आणि मागच्या बाकावर बसले. त्यांच्या एकंदर पोषाखावरून त्यांच्या परिस्थितीचा अंदाज येत होता. ते आले, बसले आणि स्वतःच्याच विश्वात मश्गुल झाले. एकमेकंशीच बोलत होते, हसत होते. आपण 'शाळेत' आहोत याच त्यांना भानच नव्हतं! बाईंनी तिच्या अभ्यासाबद्दल तक्रार केली, तर त्यांनी ती चक्क हसून उडवून लावली. त्यांना 'तिच्यात' किंवा त्या सभेत काही रसच नव्हता! एक दिवस गावावरून, तिच्या आई आल्या होत्या शाळेत. त्यांच्या चेहऱ्यावर मुलीला भेटल्याचा आनंद लपत नव्हता. खूपच साध्या होत्या त्या.
दिवस जात होते. पाचवीतून सहावीत आलो. ती शाळेला खूप दांड्या मारू लागली होती. बाईंनी समजावून सांगितलं, ओरडून सागितलं, पण काही फरक नाही. आणि एक दिवस लक्षात आलं कि ती शाळेत यायचीच बंद झालीये. शाळेतून तिला संपर्क करायचा प्रयत्न झाला. बाबांनी सांगितलं कि, ते लोकं तिथे नाही राहत आता. शाळा तिला शोधत होती..
असेच दोन-तीन महिने गेले. ती शाळेत परत येईल याची शक्यता मावळली होती. माझ्याकडे तिच्या काकांचा मोबाईल क्रमांक होता. त्या क्रमांकावर बाईंनीदेखील संपर्क केला होता, पण काही फायदा नाही झाला. एक दिवस बाबा कामावरून आले. कोणाचं लक्ष नाही असं पाहून, बाबांचा मोबाईल घेऊन, मी घराबाहेर आले. घाबरत घाबरत त्या क्रमांकावर फोन लावला. कोणी उचलला नाही. दुसऱ्यांदा उचलला. पण समोरून कोणी 'हेलो' बोलल नाही.
मी: (दबक्या आवाजात) *** आहे का?
काहीच प्रतिक्रिया नाही!
मी: *** आहे का?
पलिकडील व्यक्ती: xxxx कोण पाहिजे? xxx, xxxxxx
तो माणूस दारूच्या नशेत तर्र होता. त्याला बोलायचीही शुद्ध नव्हती. परत फोन करू नका असे तो अडखळत म्हणाला. दारूच्या नशेत तो बरळत राहिला....
मी घाबरून फोन बंद केला. 'तो' क्रमांक delete केला..मोबाईलमधून आणि माझ्या वहीतूनपण!मी सहावीत होते, लहान होते..असे अपशब्द ऐकायची सवय नव्हती. कोणालाच, काहीच सांगितलं नाही, पण मनातून भीती वाटत होती, लाज वाटत होती...'ती' पण माझ्याच वयाची होती....काय माहित कुठे गेली.............शिकायची, जगायची संधी मिळाली असेल का तिला???