दिनांक: 04/09/2011
स्थळ : महाविद्यालयाचे वाचनालय
आता सकाळचे 9 वाजत आले आहेत. वाचनालयात बसले आहे. कारण मला म्हात्रे सरांनी वर्गाबाहेर काढलं आहे. "Today you are not sitting in my class." असे शब्द कानावर पडले नि माझे डोळे झरायला लागले. कारण..कारण मी पालकांना आणलं नाही. त्यांना दादाला भेटायचय. पण दादा पाचदिवसांची सुट्टी रद्द करून कालच पुण्याला गेलाय. त्याला मी म्हटलं,आज शक्य नसेल तर शुक्रवारी भेटलास तरी चालेल आणि आता पालकांना आणल्याशिवाय वर्गात बसायचं नाही!
दादा तरी काय करणार? दोन दिवसांपूर्वीच UK वरून आलाय. रविवारी थोडा आराम करून काल, सोमवारी पहाटे 4:30 लाच तो पुण्याला गेला. मी सरांना म्हटलं,"मी आईला बोलावू का?" But he clearly said, "First you leave the class."
शलाका सावंत,'पालकांना आणलं नाही',हे एकच कारण आहे का??? मुळात पालकांना बोलवायची वेळच का आली? आणि पालकांना बोलावल्यानंतरही आपण 'AD' चं काय केलंत?आणि आता तर आधी resolve करा आणि मगच पालकांना बोलवा. माझी बाजू नक्कीच कमकुवत आहे आणि 100% दोष माझाच आहे. so...don't think now.
9:30am
बाहेर काढल यापेक्षा आपण निष्क्रीय आहोत याच वाईट वाटतय. काय बोलणार!
10:00am
चांगला अनुभव नाही आहे हा. वाचनालय, कुमार आणि आता जिन्यात बसतेय. देवा मदत कर मला...
संदर्भ: माझ्या अभ्यास्याच्या वह्यांमध्ये शेवटची,मधली पानं अशीच भरलेली असतात. भरभरून लिहायला मला फार आवडतं. 'ती' परिस्थिती, घटना मला लिहायला प्रोत्साहन देते.
No comments:
Post a Comment