मनात खूप सारे विचार असले, भावना असतील तर लिहिण्यासाठी विचार करावा लागत नाही. सोबत जोडलेलं पत्र मी माझ्या पुण्याच्या मैत्रिणींना लिहलेलं. साधारण एक वर्षापूर्वी, रात्री काम करत असताना एका वेगळ्याच आवेगाने आणि ओढीने हे पत्र लिहलेलं. ती ओढ आजही कमी झालेली नाही! Love you my gang! तुम्हाला मी खूप खूप खूप miss करते!
Friday, June 29, 2012
Tuesday, June 26, 2012
मेधाताई
मी पहिली-दुसरीत असेन तेव्हा. काय माहित,सूर्याचं आणि माझं काय वाकड होत! कधी लवकर उठायचेच नाही.दुपारची शाळा असल्याचा परिणाम! मला उठवण्यासाठी आई वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवायची.
बाबापुता करून उठवायची.
एक दिवस असेच झोपले होते. सकाळची 10-10:30 ची वेळ असेल. अचानक आई मला हाका मारायला लागली, गदागदा हलवून उठवायला लागली. म्हणाली, "खिडकीजवळ चल पटकन. बघ केवढी लोक जात आहेत खालून." मला उठवण्याचा एक प्रयत्न असं समजून मी दुर्लक्ष केलं, पण आई मला ओढतच घेऊन गेली.
खरचं, रस्त्यावरून एक मोर्चा चाललेला होता. ती माणसं गरीब वाटत होती. कुठल्यातरी गावातून आलेली असावीत. नजरेत एकप्रकारचा बावरलेपणा होता. नऊवारी साडीतल्या बायका, डोक्यावर गाठोडी ठेवून चालत होत्या. सदरा-लेंगा आणि डोक्यावर गांधी टोपी असा पुरूषांचा पोशाख होता. काही बायकांच्या कडेवर त्यांची तान्हुली होती. म्हातारेकोतारे, स्त्री-पुरुष, लहान मुलं, तरुण सगळेच त्या मोर्च्यात सहभागी झाले होते. काही माणसांनी हातात banner पकडले होते. घोषणा देत ते चालले होते, पण कुठेही गोंधळ नव्हता, एक शिस्त होती त्या मोर्च्याला! घोषणा देत असले तरी एक शांतात होती त्या मोर्च्यात!
तेवढयात एक बाई मागून घोषणा देत आल्या. हातात फलक होता. फिक्कट केशरी रंगाची पाचवारी साडी, अगदी साध्याच होत्या त्या. "अरे यांना तर कुठेतरी पाहिलं आहे" मी आणि आई एकदम उद्गारलो.
कुठे बर? अचानक आईला आठवलं,"अरे या तर मेधा पाटकर!" माझ्या इमारतीखालून चालत गेल्या!!
त्या नजरेआड होईपर्यंत मी त्यांना पाहत होते.
जास्तीत जास्त एक मिनिट मी त्यांना पाहिलं असेल, पण तो प्रसंग अजूनही नजरेसमोरून जात नाहीये. हेही आठवत नाहीये की, तो मोर्चा कशासाठी होता, ते सगळे कुठून आले होते. पण किमान माझ्यासाठी तरी, हा प्रसंग खूप विशेष आहे.
कोण,कुठल्यातरी खेड्यातले लोक, त्यांच्या हक्कांसाठी एखादी व्यक्ती आपला स्वार्थ सोडून प्राणपणाने झटते, तेव्हा त्या व्यक्तीबद्दल मनात आदर दाटून येतो. मला त्या माणसांच्या चेहऱ्यावारचे भाव आठवत आहेत, विसरूच शकत नाही मी! आणि मेधाताईचा आवेशही आठवतोय. Helicopter ने दुष्काळाची पाहणी करणारे आपले राज्यकर्ते आणि लोकांना संघटीत करून,त्यांच्यासोबत रस्त्यावर उतरणाऱ्या मेधाताई यांच्यात फार फरक आहे! hats off to you मेधाताई!

Saturday, June 23, 2012
असचं एक पान!
दिनांक: 04/09/2011
स्थळ : महाविद्यालयाचे वाचनालय
आता सकाळचे 9 वाजत आले आहेत. वाचनालयात बसले आहे. कारण मला म्हात्रे सरांनी वर्गाबाहेर काढलं आहे. "Today you are not sitting in my class." असे शब्द कानावर पडले नि माझे डोळे झरायला लागले. कारण..कारण मी पालकांना आणलं नाही. त्यांना दादाला भेटायचय. पण दादा पाचदिवसांची सुट्टी रद्द करून कालच पुण्याला गेलाय. त्याला मी म्हटलं,आज शक्य नसेल तर शुक्रवारी भेटलास तरी चालेल आणि आता पालकांना आणल्याशिवाय वर्गात बसायचं नाही!
दादा तरी काय करणार? दोन दिवसांपूर्वीच UK वरून आलाय. रविवारी थोडा आराम करून काल, सोमवारी पहाटे 4:30 लाच तो पुण्याला गेला. मी सरांना म्हटलं,"मी आईला बोलावू का?" But he clearly said, "First you leave the class."
शलाका सावंत,'पालकांना आणलं नाही',हे एकच कारण आहे का??? मुळात पालकांना बोलवायची वेळच का आली? आणि पालकांना बोलावल्यानंतरही आपण 'AD' चं काय केलंत?आणि आता तर आधी resolve करा आणि मगच पालकांना बोलवा. माझी बाजू नक्कीच कमकुवत आहे आणि 100% दोष माझाच आहे. so...don't think now.
9:30am
बाहेर काढल यापेक्षा आपण निष्क्रीय आहोत याच वाईट वाटतय. काय बोलणार!
10:00am
चांगला अनुभव नाही आहे हा. वाचनालय, कुमार आणि आता जिन्यात बसतेय. देवा मदत कर मला...
संदर्भ: माझ्या अभ्यास्याच्या वह्यांमध्ये शेवटची,मधली पानं अशीच भरलेली असतात. भरभरून लिहायला मला फार आवडतं. 'ती' परिस्थिती, घटना मला लिहायला प्रोत्साहन देते.
Sunday, June 17, 2012
मराठी-इंग्रजी
आयुष्यात बदल किती चटकन घडतात. पुण्यातले होस्टेलचे दिवस आजही लख्ख आठवतात. असं वाटत कि कालच सगळ घडून घेलाय...आणि कधी कधी वाटत , कि मी अजुनहि भूतकाळातच जगत आहे. असो. यापूर्वीही मी ब्लॉग लिहायाचा प्रयत्न केला..एकच लेख होता त्यात आणि "मी माझा ब्लॉग मराठीतून लिहित आहे आणि सध्यातरी इंग्रजीतून लिहू शकणार नाही" अस लिहलं होत. न्यूनगंड!
माझं शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झालं. शारदाश्रम विद्यामंदिर मधून.त्यानंतर अकरावी आणि बारावी मी दादरच्या कीर्ती महाविद्यालयातून. कीर्तीच वातावरण अस होत कि, कधी इंग्रजीतून बोलायची वेळ नाही आली. त्यानंतर Architecture ला प्रवेश घ्यायचा निर्णय घेतला. प्रवेश मिळाला, पुण्याच्या MMCA मध्ये. तिथले दिवस छान होते. कामापुरत किंवा कामचलाऊ इंग्रजी चालून जायचं. किशोरी, अपूर्वा, ऋतुजा, तृप्ती , जान्हवी सारखे कॉलेज सवंगडी मिळाले. सगळेच मराठी बोलणारे.. सगळ छान चाललं होत. अगदी मजेत चालल होत!

आणि एक दिवस मी कॉलेज बदललं. Architecture च्या दुसऱ्या वर्षासाठी मी मुंबईच्या रचना संसदला प्रवेश घेतला. रचना म्हणजे hi -fi कॉलेज! मस्करी सोडा, पण आतापर्यंत मी ज्या वातावरणात वाढले, त्यापेक्षा नक्कीच वेगळ वातावरण होत . विशेषतः सांस्कृतिक वातावरण. आणि ते वातावरण पाहता एक दडपण आलं होत माझ्यावर. विशेषतः इंग्रजीची भीती! 'आपण काही चुकीचं तर बोलणार नाही ना?',' व्याकरण वैगरे चुकलं तर?' असे विचार सतत मनात येत असत. अजूनही येतात . आणि मी संवाद साधनच सोडून दिल. शाळेत वकृत्व स्पर्धांत सहभागी होत असे, आणि त्यातली माझी समजही चांगली होती. किंबहुना मी कधीच लाजाळू नव्हते. आजही घरी अखंड बडबड चालू असते. पण कॉलेजमध्ये...कॉलेजमध्ये माझं बोलणंच संपलय. हजारो विचार आणि कल्पना डोक्यात थैमान घालत असतात. परंतु ते विचार व्यक्त करायचं मध्यम म्हणजेच भाषा जेव्हा अडसर ठरते, तेव्हा मूक झाल्यासारखं वाटत.
या प्रश्नाला समोरी जाणारी मी एकटीच आहे असं नाही.माझ्या वर्गातच असे बरेचसे विद्यार्थी आहेत.
मला नेहमी असं वाटत कि, समजा हाच अभ्यास मी मराठीतून केला असता तर? सध्या मी बरेच सावरले आहे. इंग्रजी ठीकठाक बोलू शकते. प्रसंगी Google translator किंवा ginger grammar check ची मदतही घेते.
पण...
पण मला अस वाटत कि, माझा अभ्यास हा मी इतर कुठल्याही भाषेपेक्षा, मला अवगत असलेल्या भाषेत नक्कीच चांगला करू शकते. कारण माझा इंग्रजीतील शब्दसंग्रह (vocabulary) इतका समृद्ध नाही.
कधी कधी असही वाटत, आपण मराठीचं वाचन,शब्दसंग्रह, समज वाया घालवत आहोत का?
Architecture चा अभ्यास मी इंग्रजीतून करू शकत नाही,अस नाही. पण मला तो ओढूनताणून नाही करायचा आहे . म्हणजे मी विचार मराठीतून करणार, कागदावर इंग्रजीतून उतरवणार, समोरच्याला समजून सांगण्यासाठी भाषांतर करणार. या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझा 'विचार' , माझी 'संकल्पना' कुठेतरी हरवत जातेय ! मला खरंच उथळ अभ्यास नाही करायचा आहे.
मला माहित आहे कि, हा अभ्यास इंग्रजीतून असण्यामागे नक्की चांगलाच आणि योग्य हेतू असेल. पण आजही माझ्यासारखे खूप विद्यार्थी या पेचात पडले आहेत .त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आणि एका समृद्ध भाषेच्या जतन करण्याच्या दृष्टीने काहीतरी सुवर्णमध्य नक्कीच निघेल.

Subscribe to:
Comments (Atom)